विवाह म्हणजे एक पवित्र संस्कार. षोड्ष संस्कारां पैकी एक. देवा – ब्राह्मणांच्या साक्षीने मारलेली गाठ.
ज्योतिष शास्त्रामध्ये सप्तम स्थान हे विवाह स्थान मानले जाते. वैवाहिक जोडीदार व वैवाहिक सौख्य या गोष्टी सप्तम स्थानावरुन बघितल्या जातात.
पण…आज चौफेर नजर फिरविली, तर या वैवाहिक सौख्याची वाताहात चाललेली दिसते.
संसाराची अशी वाताहात आणि मोडतोड होऊ नये
म्हणून कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीने जातकांना योग्य व अचुक मार्गदर्शन करता येते.
**”कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीत प्रथम जातकाची जन्मवेळ अचूक काढली जाते” ….कारण – दिलेली जन्मवेळ ही ना त्या जातकाने पाहिलेली असते ! .. किंवा
ना तेथील घडाळ्याची वेळ ही IST म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार लावलेली असते !.. डॉक्टर कडून देण्यात आलेल्या वेळेमध्ये काही मिनिटांचा फरक
असू शकतो.
आणि म्हणूनच ….१ मिनिटाच्या जन्मवेळेतील फरकाने जन्मलेल्या जुळ्या मुलांचे भविष्य वेगळे येते ना..! असो….
** कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीत सप्तमाचा म्हणजेच विवाहाचा उपनक्षत्रस्वामी व त्याचा नक्षत्रस्वामी विवाहाविषयी अचूक फलादेश देतो.
उदाहरण द्यायचं झालं तर..
समजा – वर किंवा वधूच्या कुंडलीत सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी / नक्षत्रस्वामी जर घटस्फोटाचे ६,८,१२ कार्येशभाव दाखवीत असतील तर matchmaking (गुणमिलन) करताना वर किंवा वधूच्या कुंडलीत तसे भाव नसावेत याची काळजी घ्यावयास हवी.
** Matchmaking करताना वर किंवा वधूच्या आयुर्मानाचा विचार करावयास नको का ? ..
लग्न स्थानाच्या उपनक्षत्रस्वामी / नक्षत्रस्वामी वरून
याचा विचार करता येतो.
३६ पैकी ३६ गुण जुळतात पण समोरच्या व्यक्तीच्या पत्रिकेत अल्पायुयोग आहे ! …अशी पत्रिका रिजेक्ट केलेलीच बरी.
** विवाहानंतर संतती योग नको का !.. वधूच्या कुंडलीत पंचमाचा उपनक्षत्रस्वामी / नक्षत्रस्वामी या संबंधी
अचूक उत्तर देतो.
थोडक्यात काय ? तर ..!
३६ पैकी ३६ गुण जरी जुळले तरी एखाद्या “कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीच्या जाणकार असलेल्या ज्योतिष्याकडून” वर आणि वधुच्या कुंडल्या match – making करून घेण्यास काय हरकत आहे.
हा पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे की नाही ..!
म्हणून काळजी नको का घ्यायला ..!