संस्थेविषयी माहिती...
जून २००० पासून फक्त कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत शिकविणारी एकमेव संस्था म्हणजे संकेत ज्योतिष मंडळ आज २५ व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे. स्वर्गीय श्री. शहासने सरांनी या संस्थेची स्थापना केल्यानंतर स्वर्गीय श्री. आचार्य सरांनी हा वारसा पुढे चालविला व आता मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रदिप मोरे सर व कार्याध्यक्षा सौ. उज्ज्वला गुंजीकर मॅडम आणि निपुण शिक्षक वर्ग ही जबाबदारी यशस्वीरित्या निभावत आहेत. या सर्वांच्या मदतीने आज भारतभर आणि भारताबाहेर सुद्धा या संस्थेचे विद्यार्थी पसरले आहेत.
या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे जरी वर्ग 'ऑनलाईन' घेतले जात असले तरी एका वर्गात जास्त विद्यार्थ्यांचा भरणा नाही त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे पूर्ण लक्ष देता येते. तसेच विद्यार्थ्यांना आधीच करून ठेवलेले व्हिडिओ दिले जात नाहीत आणि महागडी सॉफ्टवेअर किंवा पुस्तके सुद्धा विकत घेण्याची गरज नाही.
LIVE कुंडल्यांद्वारे प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास आणि विश्लेषण विद्यार्थ्यांना वर्गात शिकविले जाते.
कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीमध्ये 'नियम' हे अचूक आणि मोजकेच असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास सोपे जाते. खुप कमी कालावधीमध्ये विद्यार्थी या शास्त्रात पारंगत होऊ शकतात.
आठवड्यातून फक्त २ तास, शनिवार अथवा रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 'विद्यार्थ्यांच्या सोयीप्रमाणे' वर्गाची वेळ ठरविली जाते.
दर महिन्याला नवीन वर्ग सुरु होत असतात. प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.
संस्थेकडून घेतल्या जाणाऱ्या इतर अभ्यासक्रमांची माहिती या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
श्री प्रदिप मोरे
अध्यक्ष
सौ. उज्ज्वला गुंजीकर
कार्याध्यक्षा
महाराष्ट्र ज्योतिष परिषदेबरोबर संलग्न
(रजि. नं. बॉम्बे/७०९/८१/जी.बी.बी.एस.डी. सार्व. विश्वस्त क्र. एफ ७२९४
आमचा संस्थेचा अभिमान आहे की आम्ही महाराष्ट्र ज्योतिष परिषद या प्रतिष्ठित संस्थेबरोबर संलग्न आहोत. ज्योतिषशास्त्राच्या प्रसारासाठी आणि पारंपरिक ज्ञानाच्या जतनासाठी ही संलग्नता आमच्या कार्याला दिशा देते.