ज्योतिषेन मार्गप्रकाशनम् भविष्यन्तर्मार्गोद्‌दीपनम‌् !

Illuminate Your Path to Destiny

संस्थेविषयी माहिती

जून २००० पासून फक्त कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत शिकविणारी एकमेव संस्था म्हणजे संकेत ज्योतिष मंडळ २५ व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे. स्वर्गीय श्री. शहासने सरांनी या संस्थेची स्थापना केल्यानंतर स्वर्गीय श्री. आचार्य सरांनी हा वारसा पुढे चालविला व आता मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रदिप मोरे सर व कार्याध्यक्षा सौ. उज्ज्वला गुंजीकर मॅडम आणि निपुण शिक्षक वर्ग, ही जबाबदारी यशस्वीरित्या निभावित आहेत. या सर्वांच्या मदतीने आज संपूर्ण भारतभर व भारताबाहेर या संस्थेचे विद्यार्थी पसरले आहेत.

पुढे वाचा

मंडळात घेतले जाणारे अभ्यासक्रम

...
कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद

विवाह - विवाह कधी?, वैवाहिक सौख्य, घटस्फोट, द्वितीय विवाह. संतती - संतती कधी?, संतती सौख्य, संतती सौख्यात अडचणी, मेडिकल ट्रीटमेंट ने संतती, नोकरी /व्यवसाय - नोकरी कधी मिळेल, आर्थिक परिस्थिती, , शिक्षण, परदेशगमन, घर /वाहन, रोग / आजार / आयुर्दाय, वरील विषयांचा live कुंडल्यांद्वारे अभ्यास घेतला जातो

...
कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती प्रश्नकुंडली

या कोर्स मध्ये नोकरी, रोग/आजार, घर, परदेशगमन, विवाह, हरवलेली वस्तू/व्यक्ती, संतती, कर्ज/परतफेड, स्पर्धात्मक परिक्षा या विषयांचा सखोल अभ्यास घेतला जातो.

...
कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर

या कोर्स मध्ये विवाह, संतती, शिक्षण, नोकरी या ४ विषयांचा अभ्यास सूक्ष्मपणे करून घेतला जातो. अभ्यासक्रमात LIVE कुंडल्या अभ्यासल्या जातात. तसेच राहू/केतूचे संपूर्ण कार्येशभाव काढणे, कोणत्या नक्षत्रात एकही ग्रह नाही हे कसे बघावे, "कार्येशग्रह" काढणे, बलवान कार्येशभाव काढणे, कुंडलीतील रिकाम्या भावांचा विचार, या काही विषयांचा भरपूर सराव करून घेतला जातो.

...
कुंडलीतून उपाय व मंत्र साधना

या कोर्स मध्ये ज्योतिष्याने ज्योतिष शास्त्रात गती प्राप्त होण्यासाठी कोणती साधना व उपासना करावी तसेच उपासनेचे महत्व व उपाय या विषयांचा सखोल अभ्यास घेतला जातो.

...
संपूर्ण पंचांग वाचन

या कोर्स मध्ये संपूर्ण दाते पंचांग चा अभ्यास, शालिवाहन शकांची व संवत्सरांची विस्तृत माहिती, विविध गावांची विवाह मुहूर्त वेळ काढणे, गोरज मुहूर्त / अभिजित मुहूर्त विश्लेषण, गुरुबळ पहाणे, उपयुक्त मुहूर्त वाचन, उपनयन मुहूर्त, मुंजीचे मुहूर्त, गृहप्रवेश, भूमिपूजन, पायाभरणी व वास्तू शांतीचे मुहूर्त या गोष्टींचा पंचांगाद्वारे अभ्यास कसा करावा हे विस्तृत रित्या शिकविले जाते.

...
कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती व शेअर बाजार

या कोर्स मध्ये शेअर बाजारातील तेजी - मंदी /चढ - उतार समजण्यासाठी कृ. ज्यो. प. चा उपयोग कसा सर्व याबद्दल मार्गदर्शन दिले जाते.

...
कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती . ऍस्ट्रो-वास्तू

या कोर्स मध्ये कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीतून वास्तूची ओळख, दिशांची ओळख व सविस्तर माहिती, घराची रचना योग्य कशी असावी, तसेच प्रवेशद्वार, दिवाणखाना, स्वयंपाकघर, शयनगृह, देवघर, स्नानगृह, शौचालय, ब्रहतत्व आदी विषयांचा सखोल अभ्यासक्रम घेतला जातो.

Abhay Joshi's Review to Sanket Jyotish Mandal

ABHAY JOSHI

Sanket Mandal is an excellent way to learn about Jyotish shastra including its various branches like Paramparic, K P, etc. The faculty is very knowledgeable and experienced with good problem solving techniques which are taught in a simple & easy manner with numerous examples on each section.

Nagesh Shelgaonkar's Review to Sanket Jyotish Mandal

Nagesh Shelgaonkar

Sanket Jyotish Mandal is an excellent hobby class that offers professional faculty and personalized attention to all students. The booking process is easy, making it hassle-free for anyone interested in learning astrology. Highly recommend this class for those looking to enhance their knowledge in the field!

Nagesh Shelgaonkar's Review to Sanket Jyotish Mandal

सुनील तिरोडकर

संकेत ज्योतिष मंडळ ,डोंबिवली ही संस्था कृष्णमुर्ती ज्योतिष पद्धतीचे परिपूर्ण ज्ञान देणारी संस्था आहे. येथील सौ. गुंजीकर मँडम विद्यार्थ्याच्या बौद्धिक पातळी पर्यंत खाली येऊन शिकवतात. थोडक्यात प्रत्येक विद्यार्थ्याला समजे पर्यंत मँडम शिकवतात. मोरे सर व शितल मँडम सुद्धा फार सुंदर पद्धतीने शिकवतात. तसेच त्याला जोड म्हणुन काही महत्वाच्या विषयांच्या रेडी नोटस पीडीएफ स्वरुपात दिल्या जातात. एखादा विषयात काही समस्या असल्यास मँडमना तुम्ही फोन करुन विचारु शकता. मी तर आता या मंडळाचा कायम स्वरुपी विद्यार्थी आहे. ज्यांना कृष्णमुर्ती पद्धतीने ज्योतिष शिकायचे असल्यास त्यांच्या साठी हा खूप चांगला पर्याय आहे.

Sandeep Inamdar's Review to Sanket Jyotish Mandal

Sandeep Inamdar

I attended the classes online & completed 3 courses including Jyotish Bhaskar. I am happy the way the faculty teaches. Totally included practical cases which makes learning very easy

B. Joshi's Review to Sanket Jyotish Mandal

B. Joshi

My overall experience with Sanket jyotish mandal was excellent. All faculties were precisely experienced in all type of education needed for basic to advanced teaching and they ultimately explained various self studied and practically handled cases in various forms of astrology, which helps us in clear understanding and avoid each and every loophole for accurate reasoning. It will surely recommendable for every curious astrologer. thank you.

Seema Gupta's Review to Sanket Jyotish Mandal

Seema Gupta

Sanket Jyotish Mandal is an excellent hobby class with expert faculty and personalized attention. Their courses are designed to help you learn astrology in-depth and become a master of this ancient art. The teachers are highly experienced and provide individual attention to each student, ensuring that you get the most out of your classes. If you want to learn astrology, Sanket Jyotish Mandal is the perfect place for you!