राहूचे गोचर भ्रमण मीन राशीतून – जाणून घ्या आपल्यावर काय परिणाम होईल

राहूचे गोचर भ्रमण मीन राशीतून’

नमस्कार,

२८ नोव्हेंबर २०२३ रोजी राहू मीन राशीतील रेवती नक्षत्रात गोचरीने प्रवेश करतो आहे.

राहू हा अशुभ ग्रह आहे. राहूला स्वतःची दृष्टी नाही तसेच स्वतःची रास ही नाही. तो लग्न कुंडलीमध्ये ज्या राशीत असतो, त्या राशीस्वामीचे प्रतिनिधित्व करतो.

मीन राशीला शनिची साडेसाती सुरु आहे आणि मीन राशीचा स्वामी गुरु आहे. आता राहू सारखा अशुभ ग्रह गोचर भ्रमणाने जेव्हा मीन राशीत प्रवेश करेल त्यावेळी आपल्या लग्न कुंडलीमध्ये ज्या स्थानात मीन रास असेल त्या स्थानातून मिळणाऱ्या फलितामध्ये कदाचित कमतरता निर्माण होऊ शकते. त्याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत.

१) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास प्रथम स्थानात असेल तर –

जातकाने आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. कोणतीही कृती विचारपूर्वक करावी. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवावे. आपल्याबद्दल कोणाचेही गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

२) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास दुसऱ्या स्थानात असेल तर –

कुटुंबातील व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. कुटुंबातील विवाहोत्सुक व्यक्तींचे विवाह जमवताना जास्त उशीर करू नये. संतती संदर्भातील प्रश्नांसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. कमी मेहेनतीत पैसा कमविण्याचे मार्ग उपलब्ध होतील परंतु विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

३) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास तिसऱ्या स्थानात असेल तर –

लेखकांसाठी हा काळ चांगला आहे. नवनवीन कल्पना सुचतील. गुढशास्त्रामध्ये रुची निर्माण करणारा हा काळ आहे. भावंडांमध्ये थोडे नमते घ्यावे लागेल. भावंडांवर कोणत्याही प्रकारे (शिक्षण अथवा लग्न) खर्च होऊ शकतो.

४) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास चवथ्या स्थानात असेल तर –

स्वतःची जागा किंवा घरासंबंधी कोणताही निर्णय (नवीन घर घेणे, स्वतः चे रहाते घर re-development ला जाणे इ. ) विचारपूर्वक घ्या. बिल्डर कडून फसवणूक होऊ शकते. रहात्या घरातील वातावरण आनंदी रहावे यासाठी घरात वाद – तंटे होऊ देऊ नयेत. आपल्या आईची किंवा घरातील आई समान व्यक्तीची काळजी घ्यावी.

५) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास पाचव्या स्थानात असेल तर –

विद्यार्थ्यांनी अभ्यासात जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. मन विचलित होऊ शकते आणि अभ्यासात अडथळे येऊ शकतात.

ज्या व्यक्ती कलाक्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना नेहेमीपेक्षा थोडी जास्त मेहेनत करावी लागेल. प्रेमसंबंधामध्ये गैरसमज होऊ शकतात. सावधानता बाळगावी. संतती संदर्भात विशेष काळजी घेण्याचा हा काळ आहे.

६) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास सहाव्या स्थानात असेल तर –

स्वतःच्या तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. खाण्या-पिण्याच्या सवयीकडे लक्ष असू द्यावे. नियमित व्यायाम करावा. नोकरीमध्ये वरिष्ठांशी थोडे नमते घेतलेत तर बरे होईल. जर नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष तरी हा विचार पुढे ढकला. या कालावधीत कर्ज घेणे शक्यतो टाळा. घेतल्यास ऐपतीबाहेर नको. कर्ज फेडताना त्रास होऊ शकतो. या कालावधीत कोर्ट – कचेरी किंवा पोलीसांशी संबंध येऊ शकतो.

७) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास सातव्या स्थानात असेल तर –

जे जातक विवाहोत्सुक आहेत त्यांचे विवाह जमण्याची दाट शक्यता आहे. मात्र गुण-मेलन नीट करावे. जोडीदाराची माहिती पडताळून पहाणे आवश्यक आहे आणि कोणत्याही बाबतीत तडजोड (compromise) करण्याची तयारी असू द्यावी.

८) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास आठव्या स्थानात असेल तर –

कोणतेही अनाठायी धाडस नको. वाहने सांभाळून चालवावीत. कोणत्याही गोष्टीची जास्त चिंता करू नका. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या कुलदेवतेची किंवा आवडत्या देवाची उपासना करणे आवश्यक आहे.

९) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास नवव्या स्थानात असेल तर –

आपले गुरु, आदरणीय अथवा गुरुसमान व्यक्ती, यांच्याशी संपर्क वाढवा. त्यासाठी प्रवास होऊ शकतात. कोणत्याही प्रकारचे उच्च शिक्षण घेत असल्यास थोडे अडथळे येऊ शकतात, पण अंतत: विजय आपलाच आहे. नातवंडांचे सुख मिळेल. या कालावधीत कोर्टाचे निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.

१०) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास दहाव्या स्थानात असेल तर –

नोकरी – व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ लोकांबरोबर तसेच आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचारीवर्गाबरोबर उर्मट किंवा अधिकाराची भाषा वापरू नये. १० वी – १२ वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाची शाखा निवडताना काळजी घ्यावी. निर्णय चुकू शकतात. कुटुंबात वडिलांची किंवा पितासमान व्यक्तीची काळजी घ्यावी.

११) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास अकराव्या स्थानात असेल तर –

आपले पैसे काही ठिकाणी अडकले असल्यास या वर्षात थोडेफार का होईना, परत मिळण्याची शक्यता आहे. मित्र परिवारामध्ये सांभाळून रहा. खर्च होऊ शकतो. पटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. उसने पैसे देऊ नका.

१२) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास बाराव्या स्थानात असेल तर –

सर्व प्रथम खर्चाला आळा घाला. अनाठायी खर्च टाळा. हितशत्रू वाढू शकतात. नोकरी-व्यवसाय निमित्ताने परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर परदेशातील कामाची अथवा नोकरीच्या ठिकाणाची नीट चौकशी करणे आवश्यक आहे. परदेशातून भारतात येण्याचा विचार करत असाल तर परदेशातील मुक्काम वाढू शकतो. कोणत्याही परिस्थितीत कोर्ट किंवा पोलिसांच्या भानगडीत पडू नये. या कालावधीत कोणालाही कर्ज देऊ नये तसेच कर्ज घेऊ ही नये. कर्ज घेणे जरुरी असेल तर पूर्ण विचाराअंती कुवतीप्रमाणे घेणे.

अशा पद्धतीने राहू चे मीन राशीतील गोचरीचे भ्रमण आपल्याला आपल्या लग्न कुंडलीतील प्रत्येक स्थानाप्रमाणे फळ देईल. भविष्यात आपल्याबरोबर काय घडू शकतं हे आधीच समजलं तर आपण योग्य ती काळजी घेऊन सतर्क राहू शकतो.

तळटिप – कुंडलीमध्ये १२ हा अंक मीन रास दर्शवितो. लग्न कुंडलीमध्ये मीन रास (१२ हा अंक) कोणत्या स्थानात आहे व त्या प्रमाणे आपल्याला गोचरीच्या राहू चे फळ काय मिळू शकते हे समजण्यासाठी माहितीपर कुंडली देत आहे.

धन्यवाद.

सौ. उज्ज्वला गुंजीकर

9967015279

शनीची मूर्ती काळी का ?

शनीदेवांची मूर्ती काळी का असते? साडेसातीमध्ये पिंपळ वृक्षाची पूजा का केली जाते, यामागील अद्भुत पौराणिक कथा वाचा, पिप्पलाद ऋषींच्या तपश्चर्या आणि शनिदेवांशी त्यांचा संघर्ष या लेखात उलगडलेला आहे.

स्मशानात चितेवर महर्षी दधीचिंच्या अस्थिविहीन कलेवरावर दाह संस्कार होत होता आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भार्या पतिवियोगानं वेडीपिशी झाली होती… दुःखावेग सहन न झाल्यानं शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील ढोलीत आपल्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला ठेवून दिलं आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली. अशा प्रकारे महर्षी दधिची यांच्यासोबतच त्यांच्या पत्नीनंही देवांच्या लढाईत आपलं बलिदान दिलं…..

इकडे पिंपळाच्या झाडाच्या ढोलीत ठेवलेल्या त्या बाळानं तहान भुकेसाठी आकांत मांडला… खायला काहीच न दिसल्यानं त्यानं ढोलीत पडलेल्या पिंपळाची फळं खाल्ली. त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पानं हाच त्याचा आहार झाला. झाडाची ढोली हेच त्याचं घर झालं. हळू हळू ते बालक मोठं होऊ लागलं. झाडाच्या ढोलीत त्याला सुरक्षित वाटू लागलं…..

एके दिवशी देवर्षी नारद तिथून जात असता त्यांना पिंपळवृक्षाच्या ढोलीमध्ये एक लहान मुलगा दिसून आला… नारदाला आश्चर्य वाटले. त्यांनी त्या लहान मुलाला प्रश्न विचारून त्याचेकडून त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली…..

नारद : हे बालका, तू कोण आहेस …?

बालक : मलाही ते माहित नाही. मला तेच जाणून घ्यायचं आहे…..

नारद : तुझे आईवडील कोण आहेत.. ?

बालक : मला तेही माहित नाही. मला तेही जाणून घ्यायचं आहे…..

तेव्हा नारदांनी ध्यान लावलं आणि जे कळलं त्यामुळे नारदांना महदाश्चर्य वाटलं… ते म्हणाले, “हे बालका, तू महादानी अशा महर्षी दधिचीचा पुत्र आहेस. तुझ्या पित्याच्या अस्थींच्या साहाय्यानंच देवांनी वज्र नामक अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या साह्येकरूनच देवांना असुरांवर विजय मिळविणं शक्य झालं. तुझ्या पित्याचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांचं वय अवघं एकतीस वर्ष होतं…..”

बालक : माझ्या पित्याच्या अकाल मृत्युचं कारण काय होतं …?

नारद : तुझ्या पित्यास शनीची साडेसाती सुरु होती….

बालक : माझ्यावर हे असं भयानक संकट यायचं कारण काय असावं …?

नारद : शनिदेवाची साडेसाती ….

एवढं सांगून नारदांनी पिंपळ वृक्षाची पानं आणि फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिप्पलाद असं नामकरण केलं आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली…..

नारद निघून गेल्यानंतर बालक पिप्पलादनं नारदानी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं… ब्रह्मदेवानं पिप्पलादाला वर मागायला सांगितलं तेव्हा पिप्पलादनं ‘मी ज्याच्याकडे पाहीन ते त्याच क्षणी भस्म होऊन जावं’ असा वर मागितला. ब्रह्मादेवानं “तथास्तु” म्हणून पिप्पलादाला तसा वर दिला…..

हा वर मिळाल्याबरोबर पिप्पलादने सर्वप्रथम शनिदेवांना आवाहन केलं… त्याबरोबर शनिदेव प्रगट झाले. शनिदेव समोर येताच पिप्पलादने आपली नजर त्यांच्यावर रोखली त्याचबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दाह होऊन त्यांचं शरीर जळू लागलं. हे पाहून समस्त ब्रह्माण्ड हादरलं. सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवांनी पिप्पलादाला दिलेल्या वरामुळे देवांना अशक्य झालं. प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राणांची भीक मागू लागले…..

शेवटी स्वयं ब्रह्मदेवानं पिप्पलादाला “त्यानं शनिदेवांना सोडून द्यावं” अशी विनंती केली… पण पिप्पलादनं ती विनंती धुडकावून लावली. शेवटी ब्रह्मदेवानं पिप्पलादाला एका ऐवजी दोन वरदान देण्याचं मान्य केलं…..

मग मात्र पिप्पलादाला आनंद झाला आणि त्यानं ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली… पिप्पलादनं ब्रह्मदेवाला दोन वर मागितले,

१} जन्मानंतर पहिली पाच वर्षे कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही. ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही…..

२} माझ्यासारख्या अनाथाला पिंपळ वृक्षानं आश्रय दिला आहे… म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करील त्या व्यक्तीवर शनीच्या साडेसातीचा कुठलाही प्रभाव पडणार नाही…..

“तथास्तु” म्हणत ब्रह्मदेव तिथून गुप्त झाले… तेव्हा पिप्पलादनं आगीत जळणाऱ्या शनिदेवाच्या पायांवर आपल्या ब्रह्मदंडानं आघात करून त्यांना शापमुक्त केलं…..

ब्रह्मदंडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पाहिल्यासारखं चालता येईना… म्हणून तेव्हापासूनच “शनै:चरति य: शनैश्चर:” अर्थात जो हळू-हळू चालतो त्याला ‘शनैश्वर’ म्हटले जाते आणि आगीमध्ये अंग भाजल्यानं शनीची काया काळी ठिक्कर पडली…..

शनीची मूर्ती काळी का आहे आणि साडेसातीमध्ये पिंपळ वृक्षाची पूजा का केली जाते याचं रहस्य वरील कथेत दडलेलं आहे… पुढे पिप्पलादनं प्रश्नोपनिषदाची रचना केली. आजही हे उपनिषद, ज्ञानाचं कधीही न संपणारं भांडार म्हणवलं जातं…..

जय शनिदेव…

टिप – साडेसातीची पिडा कमी होण्यासाठी काही ठोस उपाय पुढील लेखात.

धन्यवाद

सौ. उज्ज्वला गुंजीकर

कार्याध्यक्षा

साडेसातीमध्ये करावयाचे १० प्रभावी उपाय | सौ. उज्ज्वला गुंजीकर – संकेत ज्योतिष मंडळ

साडेसातीमुळे जीवनात येणाऱ्या अडचणी, मानसिक तणाव आणि आर्थिक त्रास यावर शास्त्रानुसार उपाय आहेत का? सौ. उज्ज्वला गुंजीकर (संकेत ज्योतिष मंडळ) यांच्याकडून जाणून घ्या साडेसातीमध्ये सहजपणे करता येणारे १० प्रभावी आणि फलदायी उपाय, जे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात.

नमस्कार,

आज आपण शनि महाराजांच्या साडेसाती मध्ये सहजपणे करता येणारे महत्त्वाचे उपाय पाहणार आहोत. त्याआधी साडेसातीच्या त्रासाची सुरुवात कशा रीतीने होऊ शकते हे लक्षात घेऊया.

जर व्यक्ती विद्यार्थी दशेत असेल तर शिक्षणात अडथळे येतात. अभ्यासात लक्ष लागत नाही. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर अशा परीक्षेमध्ये सुद्धा अपयश येते.
विवाह जमवताना वारंवार समोरील स्थळांकडून नकार येणे, लग्न जमण्यास उशीर होणे, वैवाहिक जीवनात भांडण-तंटे अशा गोष्टी वारंवार घडताना दिसतात. नोकरीमध्ये वरिष्ठांचा त्रास किंवा नोकरी सुटणे अथवा जाणे, बढती न मिळणे, कुटुंबापासून दूरच्या ठिकाणी बदली होणे अशा प्रकारचे त्रास सहन करावे लागतात.
तसेच पैशाची चणचण भासणे किंवा असल्यास आजारपणावर जास्त पैसा खर्च होणे अशा त्रासांना तोंड द्यावे लागते.

आता आपण साडेसातीच्या काळात करावयाचे काही महत्त्वाचे उपाय पाहणार आहोत जे आपल्याला अगदी सहजपणे शक्य होऊ शकतात.
सर्वप्रथम आपण आपल्या मनात अशी व्यक्ती साकारावी जी वृद्ध/जर्जर आणि पायाने अधू आहे.
साडेसाती मध्ये शनिवारी येणाऱ्या अमावस्येला फार महत्त्व आहे ज्याला ‘शनिअमावस्या’ असं म्हटलं जातं. जर ही अमावस्या फार लांब असेल तर कोणत्याही शनिवारी हा उपाय करता येतो.

साडेसाती मध्ये शनि महाराजांचे उपाय करताना भक्त – संकेत ज्योतिष मंडळ

उपाय १ –
शनिवारी, शनि महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे. मूठभर काळे तीळ व मातीच्या पणतीत तिळाचे तेल यांचे दान करावे. जर शनि महाराजांचे मंदिर जवळपास नसेल तर श्री हनुमानाच्या मंदिरात जाऊन ११ रुईची पाने व मातीच्या पणतीत तिळाचे तेल या गोष्टी दान कराव्यात.

उपाय २ –
हवामानात होणाऱ्या बदलानुसार वृद्ध किंवा पायाने अधू असलेल्या वृद्ध व्यक्तीला कोणत्याही शनिवारी काळ्या रंगाच्या वस्तुचे इच्छाशक्ती दान करावे. जसे की, पावसाळ्यात काळी छत्री, हिवाळ्यात काळे ब्लॅंकेट अथवा काळी बंडी, उन्हाळ्यात उन्हासाठी काळी छत्री किंवा बसण्यासाठी काळ्या रंगाचे घोंगडे (चादर), काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पिण्याचे पाणी, खाण्याच्या पदार्थांनी भरलेला काळ्या रंगाचा प्लास्टिकचा डबा, काळ्या रंगाचे गुलाबजाम, काळी काठी वगैरे..वगैरे… हे दान देताना ज्या व्यक्तीस साडेसाती सुरू आहे, त्या व्यक्तीच्या डोक्यावरून फिरवून मग ती वस्तू दान करावी.

साडेसातीच्या काळात दानास जास्त महत्त्व आहे हे ध्यानात ठेवावे.

उपाय ३ –
एक स्वच्छ स्टीलचा पाणी भरलेला तांब्या घ्यावा. त्यात थोडी खडीसाखर टाकावी. त्याचबरोबर एक तेलाच्या दिव्याची पणती व ३ मीटर काळा धागा या वस्तू सोबत घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन श्री हनुमान व शनि महाराजांचे स्मरण करून तांब्यातील खडीसाखर मिश्रीत पाणी झाडाच्या बुंध्याशी टाकावे व काळ्या धाग्याने उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने झाडास सात फेरे गुंडाळावेत. धागा जास्त उरल्यास तोडू अथवा कापू नये किंवा गाठ मारू नये तिथेच गुंडाळून अडकवून ठेवावा. त्यावेळेस ||ॐ शं शनैश्वराय नमः|| हा मंत्र जपत रहावा आणि तेलाचा दिवा पेटवून साडेसातीची पीडा कमी करण्यासाठी शनि महाराजांची मनोमन प्रार्थना करावी.

उपाय ४ –
साडेसातीच्या काळात सात मुखी रुद्राक्ष देवघरात ठेवून त्याचे पूजन करावे. रुद्राक्षास गंध, हळद-कुंकू यापैकी काहीही वाहू नये. रोज सकाळी शुचिर्भूत होऊन रूद्राक्ष उजव्या हाताच्या मुठीत घ्यावा व वरील मंत्र ११ वेळा म्हणावा आणि साडेसातीची पीडा कमी करण्यासाठी शनि महाराजांची मनोमन प्रार्थना करावी.

उपाय ५ –
दर शनिवारी काळे तीळ, साखर व कणिक एकत्र करून मुंग्यांस खावयास द्यावे.

उपाय ६ –
साडेसातीच्या काळात वर्षातून एकदा शनिशिंगणापूरी जाऊन श्री शनि महाराजांचे शनिवारी दर्शन घ्यावे. यथाशक्ती पूजा व ब्राह्मणास दान द्यावे.

उपाय ७ –
साडेसातीच्या काळात बुधवारी व शनिवारी मांसाहार, मद्यपान वर्ज्य करावे. चित्त शांत ठेवावे. आचरण शुद्ध ठेवावे.

उपाय ८ –
फक्त साडेसातीतच नाही तर एरवी सुद्धा आपल्या वृद्ध आई-वडिलांची सेवा करावी. त्यांच्या औषध-पाण्याचा खर्च उचलावा. आई-वडील नसल्यास कोणत्याही गरीब वृद्ध व्यक्तीची सेवा करावी किंवा वृद्धाश्रमात देणगी द्यावी.

उपाय ९ –
साडेसातीच्या काळात काळे वस्त्र, काळा धागा अंगावर परिधान करू नये.

उपाय १० –
शनिदेवता आजन्म ब्रह्मचारी असल्यामुळे ते स्त्रियांना त्यांच्या साडेसातीत कधीही त्रास देत नाहीत. घरातील स्त्रियांच्या डोळ्यात कोणत्याही कारणाने अश्रू येता कामा नये याची घरातील पुरुषांनी काळजी घ्यावी. घरातील स्त्रीचा मान ठेवावा मग ती घरातील लहान मुलगी असली तरी सुद्धा. अन्यथा त्रास देणारी व्यक्ती शनि महाराजांच्या दंडास पात्र ठरते.

हे लक्षात ठेवावे….
जेवढी समस्या तीव्र तेवढा उपाय तीव्र म्हणूनच आपल्या समस्येची तीव्रता लक्षात घेउन व आपल्या वेळेच्या उपलब्धतेनुसार वरीलपैकी एक उपाय निवडावा व त्यात सातत्य ठेवावे, उपाय खंडीत करू नये.

महत्त्वाचे….
शनि महाराजांच्या साडेसात वर्षांपैकी कोणती वर्ष आपल्याला लाभकारक आहेत, कोणती वर्ष आपल्याला अपायकारक आहेत हे त्या विशिष्ट कुंडलीचा अभ्यास केल्यावरच अचूक सांगता येते.

धन्यवाद.
सौ. उज्ज्वला गुंजीकर
कार्याध्यक्षा
संपर्क – 9967015279

#साडेसाती #शनिउपाय #शनिमहाराज #साडेसातीचेउपाय #ज्योतिषशास्त्र #शनिदोष #कुंडली #ग्रहदोषनिवारण #शनीअमावस्या #हनुमानउपाय #वैदिकउपाय #रुद्राक्षउपाय #उज्ज्वलागुंजीकर #संकेतज्योतिषमंडळ

करिअर विषयक मार्गदर्शन

नुकत्याच मुलांच्या दहावीच्या परीक्षा संपल्या होत्या. प्रत्येक आई-वडिलांच्या मनात पाल्याच्या college admission च भुत अक्षरश: थैमान घालत होतं.
त्यावेळची अशीच एक सत्य घटना गोष्टीरूपात सांगते.
३ मे २०२१ च्या निवांत संध्याकाळी आपण पेपर चाळतो, तसे मी व्हॉट्सऍप चाळत होते. अचानक मेसेज आला, “एक पत्रिका पाठवू का ? Career guidance हवे आहे.” तो मेसेज होता माझ्या कल्याणमधील अतिपरिचित Dr. मॅडम कडून. त्यांच्या मुलीने, स्नेहलने यंदा दहावीची ( बोर्ड नव्हे शाळेचीच) परीक्षा दिली होती.
आई आणि वडील दोघेही B.A.M.S. स्वतःचे क्लिनिक. आपल्या मुलीने कोणत्या क्षेत्रात करिअर करावे ही काळजी आणि उत्सुकतेपोटी आणि ज्योतिष शास्त्रावरील विश्वास विशेष म्हणजे माझ्यावर विश्वास म्हणून त्यांचा मला फोन आला होता.
मी स्नेहल चे ८ वी व ९ वी चे गणित आणि सायन्स या विषयांचे मार्क्स आणि birth details मागवून घेतले. मार्क्स ८५+ होते. स्नेहल हुशार होती. मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली.
मला मिळालेल्या माहितीवरून आणि कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीच्या सहाय्याने कमी वेळात मी अचुक निष्कर्षापर्यंत पोहोचले होते.
अभ्यासाअंती पूर्ण विश्वासाने मी Dr. मॅडम ना फोन केला.

Dr. मॅडम, Dr. सर आणि स्नेहल त्यांच्याशी कॉन्फरन्स कॉल द्वारे संपर्क साधला. त्यांच्या प्रत्येक शंकेचे उत्तर माझ्याकडे होते. मी सांगितले की, “स्नेहल तुमच्यासारखी आयुर्वेदिक डॉक्टर अजिबात होणार नाही”. त्यावर स्नेहल चा आवाज ऐकू आला, “आई तुला सांगितलं होतं ना ! की तुझं पंचकर्म वगैरे मला अजिबात आवडत नाही. बघ, काकु पण तेच सांगतायंत”. मला हसू आवरेना. त्यानंतर स्नेहल चा प्रश्न, की “मी Pilot होईन का काकू ?”
मी म्हणाले …”नाही बाळा ! तू विमान उडवणार नाहीस तर तू डॉक्टर होणार आहेस ! ..अगदी १००%…!”
मी पुढे म्हणाले की, “ही पत्रिका इंजिनियर ची नाही. पत्रिकेत शुक्राचा अंमल जास्त आहे. शुक्र cosmetics संबंधी ज्ञान दाखवतो आणि मंगळ surgery दाखवतो.”
“स्नेहल MBBS च होणार आणि त्यानंतर तिने COSMETIC SURGEON हीच शाखा निवडावी. त्यातूनच तिला आर्थिक उत्पन्न खूप चांगले मिळणार आहे आणि ती १००% यशस्वी होणार आहे.
तिचे पुढील वैवाहिक आयुष्य देखील चांगले असणार आहे.”
जातक फॅमिली खूप खुश झाली कारण त्यांना मार्ग सापडला होता.
इति….

अशा पद्धतीने, मी सांगितल्याप्रमाणे तुमच्यापैकी प्रत्येक जण ‘कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती’च्या सहाय्याने ज्योतिष विषयक मार्गदर्शन करू शकतो.

‘कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती’ ही समजायला अतिशय सोपी आणि अचूकतेकडे नेणारी आहे. इतर पद्धतीं सारखी क्लिष्ट अजिबात नाही.

माझी सर्वांना नम्र विनंती आहे, ‘कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती’ शिका, स्वतः ज्योतिषी बना आणि आपले, आपल्या जवळच्या व्यक्तींचे भविष्य सुरक्षित करा.
तसेच इतरांना ज्योतिष विषयक मार्गदर्शन करून आपण आपले आर्थिक उत्पन्न देखिल वाढवू शकता. संकेत ज्योतिष मंडळ कायम तुम्हाला मदत करेल.
त्वरा करा. नवीन वर्ग लवकरच सुरू होत आहेत.

कार्याध्यक्षा

सौ. उज्ज्वला गुंजीकर
२० मे २०२१

कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीतून वैवाहिक सौख्य

विवाह म्हणजे एक पवित्र संस्कार. षोड्ष संस्कारां पैकी एक. देवा – ब्राह्मणांच्या साक्षीने मारलेली गाठ.

ज्योतिष शास्त्रामध्ये सप्तम स्थान हे विवाह स्थान मानले जाते. वैवाहिक जोडीदार व वैवाहिक सौख्य या गोष्टी सप्तम स्थानावरुन बघितल्या जातात.
पण…आज चौफेर नजर फिरविली, तर या वैवाहिक सौख्याची वाताहात चाललेली दिसते.
संसाराची अशी वाताहात आणि मोडतोड होऊ नये
म्हणून कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीने जातकांना योग्य व अचुक मार्गदर्शन करता येते.

**”कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीत प्रथम जातकाची जन्मवेळ अचूक काढली जाते” ….कारण – दिलेली जन्मवेळ ही ना त्या जातकाने पाहिलेली असते ! .. किंवा
ना तेथील घडाळ्याची वेळ ही IST म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार लावलेली असते !.. डॉक्टर कडून देण्यात आलेल्या वेळेमध्ये काही मिनिटांचा फरक
असू शकतो.
आणि म्हणूनच ….१ मिनिटाच्या जन्मवेळेतील फरकाने जन्मलेल्या जुळ्या मुलांचे भविष्य वेगळे येते ना..! असो….

** कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीत सप्तमाचा म्हणजेच विवाहाचा उपनक्षत्रस्वामी व त्याचा नक्षत्रस्वामी विवाहाविषयी अचूक फलादेश देतो.

उदाहरण द्यायचं झालं तर..
समजा – वर किंवा वधूच्या कुंडलीत सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी / नक्षत्रस्वामी जर घटस्फोटाचे ६,८,१२ कार्येशभाव दाखवीत असतील तर matchmaking (गुणमिलन) करताना वर किंवा वधूच्या कुंडलीत तसे भाव नसावेत याची काळजी घ्यावयास हवी.

** Matchmaking करताना वर किंवा वधूच्या आयुर्मानाचा विचार करावयास नको का ? ..
लग्न स्थानाच्या उपनक्षत्रस्वामी / नक्षत्रस्वामी वरून
याचा विचार करता येतो.
३६ पैकी ३६ गुण जुळतात पण समोरच्या व्यक्तीच्या पत्रिकेत अल्पायुयोग आहे ! …अशी पत्रिका रिजेक्ट केलेलीच बरी.

** विवाहानंतर संतती योग नको का !.. वधूच्या कुंडलीत पंचमाचा उपनक्षत्रस्वामी / नक्षत्रस्वामी या संबंधी
अचूक उत्तर देतो.

थोडक्यात काय ? तर ..!
३६ पैकी ३६ गुण जरी जुळले तरी एखाद्या “कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीच्या जाणकार असलेल्या ज्योतिष्याकडून” वर आणि वधुच्या कुंडल्या match – making करून घेण्यास काय हरकत आहे.
हा पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे की नाही ..!
म्हणून काळजी नको का घ्यायला ..!

कार्याध्यक्षा

सौ. उज्ज्वला गुंजीकर
१९ एप्रिल २०२१

जन्म कुंडलीच्या आधारे, गंभीर आजार बरा होऊ शकतो का – भाग २?

आजार क्र. २

जन्म दिनांक : २३/०५/१९७९
जन्म वेळ : १६.०२
जन्म ठिकाण : पुणे
आजार समजल्याची तारीख : १८/०६/२०२०
(कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी दोन दिवस उशीर केला.)

*जातका कडून देण्यात आलेल्या जन्मवेळेचे शुद्धीकरण (Birth Time Rectification) करूनच या पत्रिकेचा अभ्यास केला गेलेला आहे.

*आजार षष्ठस्थानावरून पहातात.
६ चा उपनक्षत्रस्वामी रवी ८,१२ नक्षत्रस्वामी शुक्र ७,२,९
आजार समजला त्यावेळी मंगळाची महादशा, राहुची अंतर्दशा, रवीची विदशा सुरू होती.

आपण यांचे कार्येश भाव बघू.
महादशास्वामी मंगळ ७,३,८ नक्षत्रस्वामी केतू ५, केतू गुरूच्या नक्षत्रात, गुरु १०,४,७
अंतर्दशास्वामी राहू ११, नक्षत्रस्वामी शुक्र ७,२,९
विदशास्वामी रवी ८,१२ नक्षत्रस्वामी शुक्र ७,२,९
*आजारासाठी अशुभ कार्येश भाव २,७,८,१२ जास्त दिसत आहेत.
*मृत्यूची तारीख : २८/०६/२०२०

नोट : कोणत्याही आजारावर योग्य वेळी उपचार केल्यास आजार नक्की बरा होतो. कुंडली च्या माध्यमातून फक्त शुभ/अशुभ काळ समजतो. त्यामुळे हा काळ समजल्यावर, अगोदरच उपचार करता येतात.

*महत्वाचे : कुंडली आजार बरा करत नाही. योग्य आणि वेळेवर घेतले जाणारे उपचारच आजार पूर्ण बरा करतात.
*हा अभ्यास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आणि फक्त विद्यार्थ्यांसाठीच आहे. याची इतर वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कार्याध्यक्षा

सौ. उज्ज्वला गुंजीकर
८ मार्च २०२१

जन्म कुंडलीच्या आधारे, गंभीर आजार बरा होऊ शकतो का? – भाग १

आजार

अशी कोणतीही व्यक्ती नाही की ज्या व्यक्तीला आयुष्यात एकही आजार झाला नाही. पण गंभीर, जीवघेणा आजार असेल तर जन्म कुंडलीच्या आधारे, तो गंभीर आजार बरा होऊ शकतो का ? हे नक्की समजू शकते.

ही संस्था फक्त कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीच्या नियमांना धरूनच live पत्रिकेचा अभ्यास आपणास देत आहे.
**जातका कडून देण्यात आलेल्या जन्म वेळेचे शुद्धीकरण (Birth Time Rectification) करूनच या पत्रिकेचा अभ्यास केला गेलेला आहे.

सध्या कोरोना विषाणूंनी थैमान घातलेले आहे. आपण या जीवघेण्या आजारातून नक्की बरे होऊ शकतो का ? किंवा तसे आपल्या पत्रिकेत योग असतील तर आधीच ‘होम क्वारंटाईन’ झालेले बरे नाही का ?

पुरुष जातक :
जन्म दिनांक : १७/०२/१९५५
जन्म वेळ : दुपारी १२.५६
जन्म ठिकाण : मुंबई
आजार : कोरोना
आजार समजल्याची तारीख : १०/०१/२०२०

प्रश्न : मी या आजारातून बरा होईन का ?

कुंडलीचे विवेचन :
आजार षष्ठस्थानावरुन पहातात.
६ चा उपनक्षत्र स्वामी बुध ९,२,५ नक्षत्र स्वामी मंगळ ११,७,१२

*आजार बरे होण्याचे कार्येश भाव ५ व ११
आजार झाला त्यावेळी जातकास राहु महादशा, चंद्र अंतर्दशा, राहु विदशा सुरू होती.
आपण त्यांचे कार्येश भाव बघू.
महादशास्वामी राहु ७ गुरूच्या राशीत, गुरु २,८,११
अंतर्दशास्वामी चंद्र ७,३ नक्षत्र स्वामी केतू १ बुधाच्या राशीत, बुध ९,२,५
विदशास्वामी राहू ७ गुरूच्या राशीत, गुरु २,८,११

*महादशेत/अंतर्दशेत/विदशेत ५ व ११ हे कार्येश भाव कार्यान्वित होत आहेत.

ही व्यक्ती दि. २६/०१/२०२० रोजी कोरोना आजारातून पूर्ण बरी झाली.

आजारावरील आणखी एक पोस्ट लवकरच.


कार्याध्यक्षा


सौ. उज्ज्वला गुंजीकर
४ मार्च २०२१